• Slider Image
  • Slider Image
  • Slider Image
  • Slider Image
  • Slider Image

स्वानंद बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित

स्वानंद वुद्धाश्रम


एफ ३३४४७/कोल्हापूर

स्थापना : १२ फेब्रुवारी २०१५

रजि . नं . ३३९०९/कोल्हापूर.

मनोगत      आज समाजात जेष्ठ नागरिकांना खूप समस्या भेडसावत आहेत. तसेच विभक्त कुटुंब पद्धती आज समाजात दृढ होत चालली असलेने या समस्येला जेष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच मातृदेवोभवो- पितृदेवोभवो ही संकल्पना तरुण मुला-मुलींमध्ये लोप पावत असलेने आई-वडिलांना सन्मान मिळत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना जगण्याचे स्वातंत्र्य मनासारखे मिळत नाही. त्यावेळी अशा जेष्ठ नागरिकांना योग्य तो मान देऊन जगण्याची उमेद मिळावी यासाठी अनेक संस्था समाजात स्थापन झाल्या आहेत.याच दृष्टिकोनातून सर्वांच्या सहकार्याने स्वानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था १२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्थापन करण्यात आली व २०१६ मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वमालकीच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. ही सेवा संस्था उभारण्यात सिंहाचा वाटा व धाडसाने पुढे येण्याची उमेद घेऊन श्री. गजानन रामचंद्र लोळगे व श्री. अशोक हिंदुराव शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. अशीच संस्थेची बहुमोल उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.