. संस्थेचे उद्देश .

क्रीडा

१) प्रथमतः जिल्ह्यातील प्रत्येक गावातील क्रीडा व सांस्कृतिक मंडल्ब ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र आणून त्याना जिल्हा स्तरीय सर्व प्रकारच्या देशी व विदेशी खेळांच्या स्पर्धाच्या कसोटीतून नैसर्गिक गुणांचा वाव देणेसाठी उत्स्फूर्त करणे.

२) जिल्हयातील प्रत्येक ग्रामीण भागातील खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांचेकडील क्रीडा नैपुण्य पारखणे व त्यांना प्रशिक्षण शिबिरातून योग्य ते प्रशिक्षण देऊन जिल्हा तसेच राज्य पातळीवर प्रवेश करून देणेसाठी मदत करणे.

३) जिल्हयातील व भागातील प्रत्येक ग्रामीण प्रशिक्षण शिबीर तसेच स्पर्धांचे आयोजन करणे. तसेच क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे. तसेच जिल्हयातील प्रत्येक शाळा, कॉलेज यांना विद्यार्थ्यांचे क्रीडा गुणांना वाव देणेसाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.

४) जिल्हयातील, आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय तसेच आंतर विद्यापीठ स्पर्धेत भाग घेऊन स्वताची प्रगती करून घेता येईल.

५) क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी न्यासाचे कार्यक्षेत्रात प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करणे तसेच व्यायामशाळा (फिटनेस सेंटर) चालू करणे.

६) क्रीडाक्षेत्रातील सर्वांगीण उन्नती व विकासासाठी क्रीडा प्रशिक्षकांना, खेळाडूना मदत करणे, शिष्यवृत्ती देणे व निरनिराळ्या योजना आखून कार्यक्रम आयोजित करणे.

७) क्रीडा प्रशिक्षक व जिम प्रशिक्षक यांचे अभ्यासक्रम चालू करणे व त्याचे हक्काचे संरक्षण करणेसाठी संस्थेतर्फे यथाशक्ती प्रयत्न करणे व मदत करणे.

८) क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी (सर्वोतकृष्ठ खेळाडूंना ) पारितोषिक देणे.