. संस्थेचे उद्देश .

सामाजिक

१) वृद्धाश्रम व समाजातील निराधार, परित्यक्ता व विधवा, कुमारी माता महिलांसाठी आधार केंद्र, आश्रम व पुनर्वसन केंद्र सुरु करणे, महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करून महिलांना त्यांचा लाभ मिळवून देणे, त्यासाठी प्रयत्न करणे तसेच पाळणाघर सुरु करणे.

२) मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त जमातीसाठी वसतिगृह, आश्रमशाळा सुरु करणे. तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालवून त्यांचे विकासासाठी प्रयत्न करणे.

३) शेती विषयक प्रशिक्षण शाळा स्थापन करणे, शासनाकडील योजना राबविणे, त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करून शासनाच्या पूर्व परवानगीने गोर-गरिबांसाठी या योजना राबविण्याचा प्रयत्न करणे.

४) गरीब, निराधार, बेवारस, अनाथ अशा व्यक्ती मयत झालेस त्यांचे अंत्यविधीसाठी मदत करणे.

५) लोकांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी म्हणून सहली, इतिहास, पदभ्रमंती इ. आयोजन करणे.

६) युवा महोत्सव आयोजित करणे, तसेच आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करणे.

७) संस्थेतर्फे गोरगरीब व गरजू लोकांना अन्नदान व इतर गरज असणाऱ्या वस्तुरूपाने दान करणे.

८) समाजातील कला, संगीत क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणे.

९) संस्थेतर्फे महिलांना एकत्र आणणेसाठी नवरात्र उत्सव आयोजित करून महिलांसाठी विविध स्पर्धांचे व कार्यक्रम यांचे आयोजन करणे