. संस्थेचे उद्देश .

पर्यावरण आणि शेती

पर्यावरण

१) पर्यावरण रक्षण व संवर्धनाबाबत व्याख्याने व चर्चा सत्रे आयोजित करून मार्गदर्शन करणे.

२) वृक्ष लागवडीचा तसेच पाणथळ जमिनीचा संरक्षणाचा कार्यक्रम राबविणे.

३) पवन व सौर उर्जेचे महत्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पटवून सांगणे व मार्गदर्शन करणे.

४) संस्थेतर्फे शेतीमध्ये संशोधन करणे व त्यासाठी प्रगत शेतीचा अवलंब करणे, त्याचा प्रचार व प्रसार करणे.

५) संस्थेतर्फे वृक्षांच्या रोपांचे वाटप करणे.

शेती

१) शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय विषयी शास्त्रज्ञाचे किंवा विषय तज्ञांचे मार्गदर्शन सभासद शेतकरी बंधूना मिळवून देवून उत्पादनात वाढ घडवून आणणे.

२) आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व व्यवहार यांचा मेळ घालून काही नवीन शेती पद्धत अवलंबिण्याचे दृष्टीने सभासदांचे अनुभवावरून प्रयत्न करणे व तशी जर नवीन पद्धत विकसित झाली तर तिचा प्रचार आणि प्रसार मंडळाच्या कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर करणेच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे.

३) ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना शेतीविषयक जगातील घडामोडींची कल्पना यावी तसेच त्यांचे ज्ञानात भर पडावी म्हणून वाचनालय सुरु करणे व सदर वाचनालयात शेती विषयक वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके, विशेष विषयांवरील पुस्तके, तसेच मनोरंजनात्मक पुस्तके इ. उपलब्ध करणे.

४) लोकांना लागणाऱ्या आवश्यक पुस्तकांचा संग्रह वाचनालयात उपलब्ध करून त्याचा लाभ त्यांना करून देणे.

५) पर्यावरण पूरक बांबू लागवड करून बांबूंचे व पर्यावरण सरंक्षण करणे.