. संस्थेचे उद्देश .

वैद्यकीय

१) मागासवर्गीय तसेच गरीब, वंचित लोकांकरिता वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्द्ध करून देणे. तसेच अपघात, आपत्काल, आजार अशा प्रसंगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देवून त्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा करणे.

२) पंचकर्म केंद्र, स्पा, आयुर्वेदिक वनस्पती लागवड तसेच योग, ध्यान, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा व होमीऑपिथी, अॅलोपॅथी ई. सेंटरची स्थापना करणे.

३) सार्वजनिक आरोग्य दारू बंदी, कुटुंब नियोजन या बाबतीत शासनाच्या व इतर समाजसेवी संस्थाच्या कार्यक्रमांना हातभार लावणे या भागात वेळोवेळी शिबिरे आयोजित करणे. तसेच कॅन्सर व हृदय विकाराचे निदान व उपचार केंद्र चालू करणे.

४) ग्रामीण व शहरी भागांमध्ये एड्स व कॅन्सर कंट्रोल केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र, शिबीर व जनजागरण, उपचार पुनर्वसन व संशोधन व कौन्सलिंग केंद्र स्थापन करणे.

५) ब्लड बॅक, रक्तदान शिबीर, मेडिकल निदान सेंटर, मिनी हॉस्पिटल, पोलीक्लीनिक, फिरता दवाखाना, रुग्णवाहिका शहरी व ग्रामीण भागात सुरु करणे.

६) माता व बालसंगोपन कार्यक्रम, आरोग्य शिक्षण तसेच आरोग्य विषयक वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद आयोजित करणे.

७) संस्थेतर्फे लोकांना आरोग्याचे महत्व समजावे तसेच त्यांना सुदृढ जीवन जगण्यासाठी योगासनाचे महत्व पटवून सांगणे व त्यांना संस्थेमार्फत योगासनाचे प्रशिक्षण देणे. ट्रस्ट तर्फे विद्यार्थी व विद्यार्थिनींचा बुध्यांक वाढावा यासाठी आत्मचिंतन, ध्यानसाधना, मन एकाग्रता करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे.

८) संस्थेतर्फे योगासन प्रशिक्षण केंद्र (योग मंदिर) सुरु करणे.