. संस्थेचे उद्देश .

महिला विकास

१) महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती महिलांना मिळवून देणे व त्या मिळणेबाबत मार्गदर्शन करणे.

२) लहानमुलांसाठी पाळणाघर, अंगणवाडी चालू करणे व मंडळामार्फत महिलांना रोजगार मिळवून देणेचा प्रयत्न करणे.

३) महिलांच्यासाठी उपयोग होतील अशा लघु व्यवसायाचे मार्गदर्शन करणे, तसेच लघुव्यवसाय, ब्युटी पार्लर, ज्वेलरी, कॅण्डल, कॅटरिंग, हस्तकला वर्ग, गारमेंट व्यवसाय, छोटे धंदे यांचे प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे.

४) महिला व बालविकासाच्या असणाऱ्या योजनांबाबत लोकांना मार्गदर्शन करणे.

५) केंद्रशासन व राज्यशासन तत्सम सेवा देणाऱ्या संस्थाच्याकडून महिला व बालविकास योजना संस्थेच्या माध्यमातून त्याचा प्रचार व प्रसार करणे.

६) महिलांना स्वतःची जाणीव करून देऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करणे.

७) समाजातील दुर्बल व प्रगत घटकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास करून त्यांचा दर्जा उंचावणेसाठी प्रयत्न करणे.

८) महिला व बालक यांचे शिक्षणासाठी अंगणवाडी, उच्च माध्यमिक शाळा चालू करून त्यांचे शिक्षणाची सोय करणे.

९) महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांचे पुनर्वसन करणेचा प्रयत्न करणे, त्यांना सर्वतोपरी मदत करणे, विधवा, परित्यक्त महिलांसाठी आधारगृह चालवणे,गृहउद्योगाचे प्रशिक्षण देणे.

१०) आरोग्य शिबीर घेणे, रक्तदान, देहदान यासाठी समाजात जागृती निर्माण करणे.

११) महिलांच्यासाठी निरनिराळ्या असणाऱ्या योजनांचा प्रसार करणे,उदा.बचतगट योजना, आरोग्य विषयक माहिती व महत्व यांचा प्रचार व प्रसार करून त्यांचा सामाजिक दर्जा सुधारणेसाठी प्रयत्नशील राहणे.