. संस्थेचे उद्देश .

१) सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी हे दोन उदात्त हेतू सामोरे ठेऊन समाजसेवा ,विधायक उपक्रम आणि कलाकार प्रोत्साहन म्हणून कार्यक्रम घेणे, व्याख्याने, शिबीर, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करणे. विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक चळवळीचे संवर्धन करणे

२) थोर विचारवंत, बुद्धिवंत, वैज्ञानिक आणि कलाकार यांना प्रोत्साहन म्हणून कार्यक्रम घेणे, व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करणे. विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक चळवळीचे संरक्षण करणे.

३) संस्थेतर्फे बालवाडी, पूर्व–प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च महाविद्यालयीन आदि शिक्षणाची सोय करणे. निवासी व आश्रम शाळा चालू करणे. सर्व शैक्षणिक विषयातील दूरशिक्षण, बहिस्थशिक्षण,पदव्युत्तर, पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करणे व त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमाला प्राधान्य देणे, तसेच निवासी शाळा चालू करणे.

४) संस्थेतर्फे सुरु करणेत येणाऱ्या शिक्षणामध्ये शास्त्र, तांत्रिक, सैनिकी, कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, व्यावसायिक, विधी, कला अध्यापन, अध्यापक व हॉटेल मँनेजमेंट इ. शिक्षणाला विशेष प्राधान्य देणे.

५) संस्थेतर्फे अंध, अपंग, अस्थिव्यंग, मतीमंद, मुकबधिर शाळा चालविणे आणि अपंगाच्या विकासकामी मदत करणे व त्यांचेसाठी निवासी शाळा चालू करणे.

६) स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबीर आयोजित करून ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी उद्युक्त करणे.

७) अल्पसंख्यांक, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी निवासी शाळा, साखर शाळा व आश्रमाची स्थापना करणे व चालविणे, बालमजुरांसाठी पुनर्वसन केंद्राची स्थापना करणे ,त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे,विध्यार्थ्यांसाठी व श्रमिक महिला ,विध्यार्थिनी यांचेसाठी वसतिगृहे ,बोर्डींग स्थापन करणे.

८) वैद्यकीय व पँरामेडीकल उदा ,क्ष –किरण ,तंत्रज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,नेत्रोपचार तंत्रज्ञ संबधित अभ्यासक्रम चालू करणे .